Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ४ था [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 4 | Swadhyay 4

    स्वाध्याय ४ था

इयत्ता - ७ वी            विषय - भूगोल



प्र. १ ला ] योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करून लिहा.

१] हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याचा ............. होतो.
        गतीवर, दाबावर ]
२] हवेच्या दाबातील फरक जिथे कमी असेल, तेथे वारे …......... गतीने वाहतात.
        मंद, जलद]
३] वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा ......... या परिमाणात मोजतात.
        नॉट्स, हॉटस् ]
४] उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून ........... वळतात.
        उजवीकडे, डावीकडे ]
५] उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे म्हणजे .............. होय.
       पूर्वीय वारे, पश्चिमी वारे ]
६] हवेची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशात .............. केंद्रभाग हा 'L' (Low) या अक्षराने दाखवतात.
        आवर्ताचा, प्रत्यावर्ताचा ]
७] दिवसा ................ वाहणारे वारे सागरी ( खारे ) वारे असतात.
        समुद्राकडून जमीनीकडे, जमिनीकडून समुद्राकडे ]


प्र. २] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] मोसमी वारे केव्हा निर्माण होतात?
२] प्रत्यावर्त वाऱ्यांची परिस्थिती केव्हा निर्माण होते?
३] हवेची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशात कशाचा केंद्रभाग हा 'H' (High) या अक्षराने दाखवतात?
४] कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखले जातात?
५] पॉसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनार्‍यालगत निर्माण होणारी वादळे कोणत्या नावाने ओळखले जातात?
६] पर्वतीय वारे केव्हा वाहतात?


प्र. ३] पुढील विधाने सत्य की असत्य लिहा. 

१] पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा उत्तर होय.
२] मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्याकडून उपध्रुवीय  कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात.
३] पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्टायांकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात.
४] जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते.
५] रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे भूमीय ( मतलई ) वारे असतात.
६] फॉन हे वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात.
७] काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात हे स्थानीय वारे असतात.


प्र. ४] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचे दाब जास्त का असतो?
२] पृथ्वीच्या परिवलनाचा वार्यांवर कोणता परिणाम होतो?
३] आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात?
४] आवर्त वार्यांची कारणे व परिणाम लिहा.


प्र. ५] पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.

१] विषुववृताजावळ हवेचा पट्टा शांत असतो.
२] वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
३] उन्हाळ्यातील  मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमीनीकडून येतात. 
४] उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायवयेकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. 

प्र. ६] टिपा लिहा.

१] आवर्त
२] प्रत्यावर्त
३] मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे

प्र. ७] पुढे हवेचा दाब क्रमवार मिलिबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून  आवर्त व प्रत्यावर्तची आकृती काढा. 

१] ९९०, ९९४, ९९६, १००० 
२] १०३०, १०२०, १०१०, १०००



Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय २ रा

👉 स्वाध्याय ३ रा


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय ४ था [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 4 | Swadhyay 4 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments