Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय १ ला [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 1 | Swadhyay 1

 स्वाध्याय १ ला

इयत्ता - ७ वी            विषय - भूगोल



प्र. १ ला ] रिकाम्या जागा भरा.
[ १०७, दोनदा, चंद्रग्रहण, अप्रत्यक्षपणे, ९० ]

१] चंद्र आपल्या परिभ्रम मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, तेव्हा ................... घडून येते.
२] चंद्र हा सूर्याभोवती ................ प्रदक्षिणा घालतो.
३] शुद्ध व वद्य अष्टमीला चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यात ........ अंशाचा कोण होतो.
४] खग्रास चांद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी .............. मिनिटे इतका असतो.
५] चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी ........... छेदतात.



प्र. २] चुकीची उदाहरणे दुरुस्त करून लिहा.

१] सूर्यग्रहण प्रत्येक अमावास्येला होत.
२] चंद्रग्रहण अमावास्येला होते, पण प्रत्येक अमावास्येला होत नाही.
३] चंद्राची परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखा नसतो.
४] सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते.
५] सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.


प्र. ३] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] उपभू स्थिती म्हणजे काय?.
२] चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय ?
३] खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो?
४] चंद्र प्रत्यक्ष पणे कोणाला प्रदिक्षणा घालतो?
५] चंद्राची कक्षीय गती म्हणजे काय ?


प्र. ४] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?
२] चंद्राची उपभू व अपभू स्थिती म्हणजे काय?
३] दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत?


प्र. ५] पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.

१] दर आमावास्येस सूर्यग्रहण होत नाही.
२] चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.
३] चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसत नाही?


प्र. ६] टिपा लिहा.

१] खग्रास सूर्यग्रहण
२] खंडग्रास चंद्रग्रहण
३] कंकणाकृती सूर्यग्रहण


प्र. ७] आकृत्या काढा व नावे लिहा.

१] खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण
२] खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण



Best of Luck....

👉 Online Test


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय १ ला [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 1 | Swadhyay 1 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments