Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय २ रा [ ७ वी इतिहास व नागरिक शास्र] | Class 7 History and Civics Home Work 2 | Swadhyay 2

   स्वाध्याय २ रा

इयत्ता - ७ वी
विषय - इतिहास व नागरिक शास्र



प्र. १] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१] आपला देश ........................ रोजी स्वतंत्र झाला.
२] संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत असे केल्यास ते कायदे ............... रद्द ठरवू शकते.
३] भारताचे संविधान तयार करण्यासठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती ............... म्हणून ओळखली जाते.
४] विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे ................ स्वातंत्र्य आहे.
५] संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा .................. दस्तऐवज होय.
६] ............... म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय.


प्र. २] खालील प्रश्नानची योग्य पर्याय निवडून उत्तरे द्या.

१] .................. संविधान सभेचे सदस्य नव्हते.
    अ] महात्मा गांधी            ब] डॉ. राजेंद्रप्रसाद
    क] पंडीत नेहरू            ड] डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२] ...................... हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
    अ] डॉ. राजेंद्रप्रसाद            ब] महात्मा गांधी
    क] पंडीत नेहरू                ड] डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३] लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ................. हाती असते.
    अ] राज्याच्या            ब] लोकांच्या
    क] लष्कराच्या          ड] यापैकी नाही

४] ...................... राज्यात सर्व धर्माना समान मानले जाते.
यापैकी नाही
    अ] धर्मनिरपेक्ष            ब] गणराज्य
    क] सार्वभौम               ड] यापैकी नाही

५] २६ नोव्हेंबर हा दिवस ............... म्हणून साजरा केला जातो.
    अ] जल दिन            ब] संविधान दिन
    क] स्वातंत्र्य दिन      ड] प्रजासत्ताक दिन

६] ......................... राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते.
    अ] सार्वभौमत्व            ब] धर्मनिरपेक्ष
    क] पारतंत्र्य                ड] समाजवादी


प्र. ३] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] संविधान सभेत एकूण किती सदस्य होते?
२] संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला?
३] भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे कोणाला भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात?
४] २६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो?
५] संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
६] कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?
७] एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा कोणत्या शब्दाचा अर्थ आहे?


प्र. ४] पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१] देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला कायदेमंडळ असे म्हणतात.
२] भारताच्या संविधान निर्मितीला इ.स.१९४७ पासूनच सुरवात झाली.
३] जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल , तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल.
४] आपल्या संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते.
५] संविधानाच्या उद्देशिकेची सुरवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते.
६] वयाची २१ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्यात अधिकार आहे.


प्र. ५] संकल्पना स्पष्ट करा.

१] समाजवादी राज्य
२] संविधान दिन
३] सार्वभौम राज्य
४] समता
५] संविधान सभा


प्र. ६] थोडक्यात उत्तरे लिहा.

१] प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?
२] समाजात व्याक्तीप्रतिष्ठा कशी निर्माण होईल?
३] शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात?
४] संविधानाच्या तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे लिहा?



Best of Luck....

👉 Online Test

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय २ रा [ ७ वी इतिहास व नागरिक शास्र] | Class 7 History and Civics  Home Work 2 | Swadhyay 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments