Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ३ रा [ ५ वी परिसर अभ्यास १] | Home Work 3 | Swadhyay 3 EVS 1

  स्वाध्याय ३ रा

परिसर अभ्यास - १
घटक - ५ व ६



प्रश्न १ ) रिकाम्या जागा भरा.

१] चंद्राच्या कला, गुरुत्वाकर्षण इत्यादी व्यवहार ......... नियमाप्रमाणे चालतात.
२] भारतात १९८८ नंतर ......... वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क देण्यात आला.
३] नियमाच्या पालनाने आपल्या व्यवहारात ........ निर्माण होते.
४] आपल्याला अनेक गरजांची पूर्तता ......... होते.
५] माणसांसाठी असणाऱ्या नियमांत ............ नुसार बदल करावे लागतात.
६] सामाजिक जीवनात ......... सहकार्याची गरज असते.
७] साहिष्णुता ही ............. सलोख्याची पहिली पायरी आहे.



प्रश्न २ ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] चुकीच्या रूढी-परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला काय येते?
२] जादूटोणा करून लोकांना फसवणे, यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला?
३] स्वातंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट केली?
४] आपले सामाजिक जीवन कशाच्या कधारे चालते?
५] आपण कोणाचे नियम बदलू शकत नाही?
६] प्रामाणिकपणा आपल्याला कशी बनवतो?
७] आपल्या देशात कोणत्या वृत्तीला विशेष महत्व आहे?


प्रश्न ३ ) पुढील चूक की बरोबर ते ओळखा.

१] आपल्या जीवनात आपण अनेक रूढी-परंपरांचे पालन करीत असतो.
२] मुलगा - मुलगी किंवा स्त्री - पुरुष यांचा दर्जा असमान असतो.
३] समानता हा नियमांचा आधार असतो.
४] अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत.
६] प्रामाणिक व्यक्तीबद्दल कुटुंबात व समूहात आदर निर्माण होतो.
७] परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात.



पश्न ४ ) पुढील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा.

१] कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो?
२] निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात?
३] सार्वजनिक जीवनातील निर्णयात आपण कसे सहभागी होऊ शकतो?
४] सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणाचे महत्व सांगा?
५] सहकार्याचे फायदे कोणते सहिष्णुतेचे भावना कशी निर्माण होते?


पश्न ५ ) पुढील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा.

१] सहिष्णुता वृत्ती चे महत्व स्पष्ट करा.
२] समाजात स्त्री पुरुष समानतेची भावना का वाढीस लागली पाहिजे?
३] लहान मुलावर समाजात कोणते अन्याय होतात?
४] आपण नियम पालन का केले पाहिजे?
५] समाजासाठी नियमांची आवश्यकता का असते?



पश्न ६) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] प्रामाणिकपणाचे आपल्या व्यक्तिमत्त्वावर कोणते परिणाम होतात?
२] समानता हा नियमांचा आधार असतो हे विधान स्पष्ट करा?
३] समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात कोणता फरक आहे?
४] कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या?
५] पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात?



Best of Luck....

👉 Online Test

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय 2 ला


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय ३ रा [परिसर अभ्यास १] | Home Work 3 | Swadyay 3 EVS 1 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments