Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय १ ला [५ वी परिसर अभ्यास १] | Home Work 1 | Swadyay 1 EVS 1

स्वाध्याय १ ला
परिसर अभ्यास १
घटक - १, २ व ३



प्रश्न १ ला) रिकाम्या जागा भरा.

१) एखाद्या खगोलाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला त्याची ................. कक्षा असे म्हणतात.

२) स्वतःची कक्षा असणाऱ्या आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या; आकारमानाने लहान असणाऱ्या खगोलीय वस्तूंना ............... असे म्हणतात.

३) .................... स्वतः भोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती ही फिरतो.

४) पृथ्वीच्या ............... दिन व रात्र होतात.

५) पृथ्वी पश्चिमेकडून ................ फिरते.

६) नदीचे पाणी नैसर्गिकरीत्या एखाद्या ठिकाणाहून उंचीवरून खाली पडते तेव्हा .............. तयार होतो.

७) समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या खूप मोठ्या सुळक्यांना .................... म्हणतात.

८) जमिनीवरून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या जलरूपांपैकी ................ सर्वात लहान, तर नदी सर्वात मोठी असते.


प्रश्न २ रा ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे साधारणपणे किती दिवस धरतात ?

२) अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वी कडील भाग अधिकाधिक प्रकाशित होत जाणाऱ्या पंधरा दिवसाच्या कालावधीला काय म्हणतात ?

३) उंचसखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो त्याला काय म्हणतात ?

४) लहान सरोवराला काय म्हणतात ?

५) पृथ्वीच्या तपांबराच्या बाहेरील थराला काय म्हणतात ?

६) स्वयंप्रकाशित खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?


पश्न ३ रा) प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) अवकाश प्रक्षेपणात रॅकेट का वापरतात ?

२) कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?

३) विषुववृत्त म्हणजे काय ?

४) ढग कशाचे बनलेले असतात ?

५) बटुग्रह म्हणजे काय ?

६) जीवावरण कशाला म्हणतात ?



प्रश्न ४ था) कशाला म्हणतात ?

१) पौर्णिमा        २) बाष्पीभवन        ३) चांद्रमास

४) उपग्रह        ५) संघनन


प्रश्न ५ वा) कोणतीही दोन उदाहरणे लिहा.

१) हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी.

२) पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे.

३) सूर्याभोवती परिभ्रम करणारी ग्रह.

४) भूजल कोठे मिळते.

५) जमिनीवरून वाहणारे पाणी कोठे मिळते.


प्रश्न ६ वा) जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा.



Best of Luck....

👉 Online Test - 1

👉 Online Test - 2

👉 Online Test - 3


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय १ ला [परिसर अभ्यास १] | Home Work 1 | Swadyay 1 EVS 1 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments