केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२३ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
CTET 2023 form filling date announced
CTET application form 2023 date announced
CTET Exam form filling date announced
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या (CTET form filling date announced) तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याची सुरवात CTET परीक्षेची १७ वी संगणक आधारित चाचणी जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित केली जाणार असून ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ( ctet official website ) ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांना केवळ CTET official website - ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे पर्यंत असणार आहे, तर 25 नोहेंबर २०२२ रोजी सकाळी ११.५९ पर्यंत फी भरता येणार आहे.
सामान्य/ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये, तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याबाबत सीबीएसईने जुलै 2021 मध्ये अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, यात काही बदलही करण्यात आले आहेत.
0 Comments