Boxed(True/False)

Header Ads

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ परीक्षा जाहीर | TITA Exam 2022 Announced

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ परीक्षा जाहीर

TITA Exam 2022 Announced

Teacher Aptitude and Intelligence Test 2022


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ परीक्षा जाहीर | TITA Exam 2022 Announced | Teacher Aptitude and Intelligence Test 2022


            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' (Pavitra Portal) या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' ( Teacher Aptitude and Intelligence Test 2022 ) ( MAHA TITA Exam 2022 ) या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' ( Teacher Aptitude and Intelligence Test 2022 ) ( MAHA TITA )

२. उपलब्ध पदसंख्या :-  राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार 'पवित्र' (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः-

३.१ परीक्षेचे माध्यम :- परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी- मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.

३.२ अभ्यासक्रम:-

सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' ( Teacher Aptitude and Intelligence Test 2022 ) ( MAHA TITA )

• परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



• अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.

• सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.

• ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

अधिक माहितीसाठी

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२

परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचनांची PDF

👇


👇

ऑनलाईन नोदणी करण्यासाठी www.mscepjan23.in या संकेत स्थळाला भेट देणे.
ऑनलाईन नोदणी करण्यासाठी www.ibpsonline.ibps.in या संकेत स्थळाला भेट देणे.

तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणारे प्रश्नसंच

👇



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ परीक्षा जाहीर | TITA Exam 2022 Announced | Teacher Aptitude and Intelligence Test 2022  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments