Boxed(True/False)

Header Ads

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर | 10th and 12th exams Dates announced

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

10th and 12th exams Dates announced 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर | 10th and 12th exams Dates announced

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर ( 10th and 12th exams Dates announced ) :-

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक ( 10th and 12th Written Exam Time Table ) अंतिम करण्यात आले आहे.


          बारावीची परीक्षा ( HSC Exam Date 2023 ) २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचे (SSC Exam Date 2023 ) २ मार्चपासून सुरू होणार असून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते. या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले.

          दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

          प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर | 10th and 12th exams Dates announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments