Boxed(True/False)

Header Ads

नाशिक महापालिका हद्दीतील १३ डिसेंबर पासून सर्व शाळा सुरू होणार | All schools in Nashik Municipal Corporation area will be open from 13th December

नाशिक महापालिका हद्दीतील १३ डिसेंबर पासून सर्व शाळा सुरू होणार

 All schools in Nashik Municipal Corporation area will be open from 13th December

नाशिक महापालिका हद्दीतील १३ डिसेंबर पासून सर्व शाळा होणार | All schools in Nashik Municipal Corporation area will be open from 13th December

नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळा आता येत्या सोमवारपासून म्हणजे 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या पाहणीनुसार शहरातील ६० टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली.

शाळेसाठी खलील सूचना पालन अनिवार्य

  • शाळा सुरू होण्यापूर्वी व सुटल्यांतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत भरविण्यात याव्या.
  • एका बेंचवर एक विद्यार्थी तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे.
  • विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनिंग चाचणी घ्यावी.
  • पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये.
  • प्रत्येक शाळेत वैद्यकीय मदत कक्ष सुरू करावा.
  • ज्या पालकांना शक्य असेल त्यांनी पाल्यांना स्वत: शाळेत सोडावे.
  • वाहन चालक व वाहक यांनी स्वत: तसेच विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
  • लसीकरण झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनाच शाळेत बोलवावे.
  • पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके घेऊ नये.
  • वर्ग खोल्यांचे दरवाजा व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा जास्त ठेवू नये. जेवणाची सुटी नसेल.
  • विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी कोरोना संशयित आढळल्यास त्याला स्वतंत्र खोलीत ठेवावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधावा.
  • पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेऊ नये.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  नाशिक महापालिका हद्दीतील १३ डिसेंबर पासून सर्व शाळा सुरू होणार | All schools in Nashik Municipal Corporation area will be open from 13th December ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments