Boxed(True/False)

Header Ads

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार |Classes I to IV will begin soon

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार |Classes I to IV will begin soon


          महाराष्ट्र राज्यातील पाचवी ते बारावी आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर शाळेबाबत निर्णय होईल.

          दिवाळीनंतर शाळा सुरू होऊ शकतात असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी पहिली ते चौथीपर्यंतचे सवर्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. गेल्या दोन वर्षांपासून मुले शाळेपासून लांब आहेत त्याचा परिणाम त्यांच्य आयुष्यावर होऊ शकतो.

मराठी वर्णमाला


          मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता शाळा सुरू करावे. अनेक गावांमध्ये शाळा बंद असल्या तरी मुले वर्गात येऊन बसत आहेत. काही शिक्षक त्यांना शिकवत आहेत. त्यामुळे आता तातडीने निर्णय घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी विनंती केली.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार |Classes I to IV will begin soon ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments