Boxed(True/False)

Header Ads

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये महत्वाचे बदल | CTET Exam important changes

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये महत्वाचे बदल

CTET Exam important changes



केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये महत्वाचे बदल होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड ने अधिकृत नोटीस जाहीर करुन याबद्दल माहिती दिली. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार सीटेट २०२१ चा परीक्षा पॅटर्न वेगळा असणार आहे. तसेच ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार नाही.

सीबीएसई सीटीईटीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत बदल केले जात आहेत. घोकंपट्टीचे शिक्षण बंद व्हावे यासाठी एनईपीमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न मध्ये बदल केले जात आहेत.

आता सीटीईटी अभ्यासक्रम आणि प्रश्न हे उमेदवारांच्या तथ्यात्मक ज्ञानाऐवजी थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, रिजनिंग, संकल्पनेची समज आणि अॅप्लीकेशनच्या अभ्यासावर पारखले जातील. उमेदवारांना नवा सीटेट पॅटर्न समाजावा यासाठी सीबीएसईतर्फे नवे सॅंम्पल पेपर्स आणि ब्लूप्रिंट जाहीर केली जाणार आहे.

ऑनलाइन परीक्षा

सीटेट परीक्षा आयोजनात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२१/ जानेवारी २०२२ मध्ये होणारी सीटीईटी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार असल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे. यातून येणारे शिक्षक हे कॉम्प्युटर आणि इंटरनेट फ्रेंडली देखील होतील. तसेच ओएमआर शीट्स आणि प्रिंटेड प्रश्न पत्रिकांमुळे मोठ्या प्रमाणात होणारा कागदाचा वापर टाळला जाऊ शकेल.

मॉक टेस्ट

सीटेट एक्झामचा नव्या पॅटर्नची अभ्यासकांशी ओळख व्हावी यासाठी सीबीएसई प्रत्येक जिल्ह्यात फॅसिलिटेशन सेंटर बनवणार आहे. या सुविधा केंद्रांमध्ये सीईटी ऑनलाइन मॉक टेस्टचा सराव करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही.

पुढच्या सीटेट परीक्षा २०२१ साठी अर्ज भरल्यानंतर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये महत्वाचे बदल | CTET Exam important changes ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 



Post a Comment

0 Comments