Boxed(True/False)

Header Ads

९ वी व ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार

९ वी व ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार

९ वी व ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार

Maharashtra Government Promoted 9 & 11 Class Students to Next Class Without Exams

          महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

नवोदय सराव सराव प्रश्न संच

          यंदा नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तर दुसरीकडे निर्बंध, करोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होतं. परंतु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

         तुम्हाला ९ वी व ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments