Boxed(True/False)

Header Ads

CTET Exam Date Declare



CTET Exam Date Declare 

CTET Exam Date Declare


          CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता) परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे यंदाची परीक्षा पुढे ढकलण्यातआली असून यापूर्वी जुलै 2020 रोजी परीक्षा घेण्याचं नियोजन होतं. मात्र, आता 31 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येईल. केंद्रीय माध्यमिक बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. कोरोना महामारीचं सावट लक्षात घेऊन बोर्डाने परीक्षार्थींना परीक्षा केंद्राचं ठिकाण बदलण्याची मुभा दिली आहे.

          परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. 7 नोव्हेंबरपासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध होणार आहे. परीक्षार्थींना 16 नोव्हेंबर पर्यंत हा पर्याय खुला राहणार असून या कालावधीत आपणास हव्या असलेल्या परीक्षा केंद्राची निवड करावी, असे आवाहनही बोर्डाने केले आहे.


          उमेदवारांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांची शहरं देण्याचा अटोकाट प्रयत्न बोर्डाकडून करण्यात येत आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव परिस्थिती बदलल्यास, परीक्षार्थींनी निवडलेल्या 4 शहरांव्यतिरीक्त इतर कुठल्याही शहराची निवड केली जाऊ शकते, असेही सीबीएसईने म्हटले आहे. परीक्षा कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी तब्बल 135 शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार, लखीमपूर, नागाव, बेगुसराय, गोपाळगंज, पूर्णिया, रोहतास, सहरसा, सारण, भिलाई / दुर्ग, बिलासपूर, हजारीबाग, जमशेदपूर, लुधियाना, आंबेडकर नगर, बिजनौर, बुलंदशहर, देवरिया, गोंडा, मैनपुरी, प्रतापगड, शाहजहांपूर, सीतापूर आणि उधमसिंह नगर या नवीन शहरांचा परीक्षा केंद्रांसाठी समावेश करण्यात आला आहे.

          दरम्यान, सीटीईटी परीक्षा जुलै आणि डिसेंबर महिन्यात वर्षातून दोनवेळा घेण्यात येते. सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांव्यतिरिक्त घेण्यात येणारी ही एकमेव भरती चाचणी आहे.
-लोकमत




हे पहा

Free online Test



हे पहा

स्कॉलरशीप प्रश्नपत्रिका २०१७ ते  १९




          तुम्हाला CTET Exam Date Declare  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments