Boxed(True/False)

Header Ads

शाळेची दिवाळीची सुट्टी 14 दिवसांपर्यंत वाढवली


शाळेची दिवाळीची सुट्टी १४ दिवसांपर्यंत वाढवली

शाळेची दिवाळीची सुट्टी 14 दिवसांपर्यंत वाढवली


          शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या वाढीव दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसांचीच दिवाळी सुट्टी यंदा देण्यात आली होती.

          शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांचे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

          राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण, कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली. त्यामुळे दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत होता. या सुट्टीवरुन विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करत दिवाळी सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली होती.

           या नवीन परिपत्रकानुसार उद्यापासूनच दिवाळीची सुट्टी शाळांना लागू होत आहे.



          तुम्हाला शाळेची दिवाळीची सुट्टी 14 दिवसांपर्यंत वाढवली ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments