Boxed(True/False)

Header Ads

4 जानेवारी पर्यंत नाशिकमध्ये शाळा बंद


4 जानेवारी पर्यंत नाशिकमध्ये शाळा बंद

4 जानेवारी सुरु होतील नाशिकमध्ये शाळा


          विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.

          दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.

          मुंबईमध्ये ३१ डिसेंबरनंतर, पुण्यात १३ डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तेथील प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राबाबत शाळा सुरु करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

          शाळा सुरु करण्यासाठी २३ नोव्हेंबर म्हणजेच उद्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली होती. अशातच आता नाशिकमधील शाळांबाबत देखील राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्य ठरेल असे पोलीस, आरोग्य खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे 4 जानेवारी पर्यंत शाळा बंद असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.





          तुम्हाला 4 जानेवारी पर्यंत नाशिकमध्ये शाळा बंद ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments