Boxed(True/False)

Header Ads

आता होणार ऑनलाईन शिक्षणाचे मूल्यांकन

आता होणार ऑनलाईन शिक्षणाचे मूल्यांकन

आता होणार ऑनलाईन शिक्षणचे मूल्यांकन

          महाराष्ट्रात कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन वर्गात शिकवलेलेे विद्यार्थ्यांना किती आत्मसात केले, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमातून चाचणी घेतली जाणार आहे.

           स्वाध्याय उपक्रमातून चाचणीतून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चाचण्या होणार आहेत. त्यानंतर ऊर्दू माध्यमाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार आहे.
          SCERT आणि पुणे व Leadership for Equity and Convenience यांच्या माध्यमातून हे स्वाध्याय तयार करण्यात आले असून, दर शनिवारी स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गणितातील 10 आणि भाषेतील 10 प्रश्न सरावासाठी पाठवण्यात येणार आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत. दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

           विद्यार्थ्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे देताच त्यांच्या कामगिरीचा अहवाल विद्यार्थ्याला मिळणार आहे. जेणेकरून त्यांना स्वत:च्या कामगिरीचे मूल्यमापन करणे शक्य होईल आणि ते सक्षम होऊ शकती, हा त्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा अहवालही शिक्षकांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पायाभूत आणि संख्याज्ञान यावर भर असून, त्यासाठी स्वाध्याय हा उपक्रम मदतगार ठरणार आहे.

          पहिली ते दहावीच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील.त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील.सुरुवातीला मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसांत ऊर्दू माध्यमही सुरू केले जाणार असल्याचे परिषदेने म्हटले आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये 

  1. स्वाध्याय या उपक्रमांतर्गत एका स्मार्ट फोनद्वारे 100 विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थी, पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत ते देखील या उपक्रमात सामील होऊ शकतात.
  2. शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण हे यासाठी मदत करू शकतात.
  3. स्वाध्याय उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील 10 आणि भाषेतील 10 प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल
  4. हे प्रश्न त्या त्या इयत्ता आणि विषयाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतील.
- लोकमत

          तुम्हाला आता होणार ऑनलाईन शिक्षणाचे मूल्यांकन ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 




Post a Comment

0 Comments