Boxed(True/False)

Header Ads

MPSC पूर्व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

MPSC पूर्व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

MPSC पूर्व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

          MPSC ने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

          परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे कळवण्यात आले आहे. याबरोबर प्रवेश प्रमाणपत्राशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, परीक्षेस येतांना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचा फोटो व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

          MPSC ची परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे इत्यादी सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास अर्ज सादर केल्याच्या तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या दिलेल्या ईमेल व दूरध्वनी क्रमांकावरून आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल, असे देखील कळण्यात आले आहे.

- लोकसत्ता

          तुम्हाला MPSC पूर्व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments