Boxed(True/False)

Header Ads

MHT-CET PCB Group Hall tickets arrived

MHT-CET PCB Group Hall tickets arrived

MHT-CET PCB Group Hall tickets arrived
           महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट MHT-CET परीक्षेचे हाॅलतिकिट सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना 


 या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे हाॅलतिकिट डाऊनलोड करता येणार आहे. हे हाॅलतिकिट केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे हाॅलतिकिट अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे.


          महाराष्ट्रात कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील हाॅलतिकिटमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे. हाॅलतिकिटमध्ये कोणत्याही त्रुटी वा चूक आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे. एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.


          तुम्हाला MHT-CET PCB Group Hall tickets arrived ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments