Boxed(True/False)

Header Ads

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पोर्टल सुरू

 प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती 

पोर्टल सुरू

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पोर्टल सुरू

          देशातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी घोषीत केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची राज्यात तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेश राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही शिष्यवृत्ती योजना २३ जुलै २००८ पासून राबविली जात आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
           मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, शीख तसेच बौद्ध आणि जैन समाजातील इयत्ता १ ली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर योजना राबविली जात आहे. २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षातील या योजनेच्या अंमलबजावणीसाठी NSP २.० हे (www.scholarships.gov.in) पोर्टल केंद्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

          या पोर्टलवर शाळांना अल्पसंख्याक गरजू विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करता येणार आहे. यासाठी शाळेचे नोंदणी अर्ज पोर्टल वर भरणे आवश्यक आहे. शाळांनी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी www.scholarships.gov.in वर नोंदणी करावी असे कळविले आहे.



          महाराष्ट्र राज्यातील तब्बल २ लाख ८५, ४५१ योजनेचा लाभ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या धर्मातील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार मुस्लिम समाजातील १ लाख ६६ हजार, बौद्ध समाजातील ८३ हजार ७८७, जैन १७ हजार ९६५, ख्रिश्चन १३ हजार ८५६, शीख २ हजार ८६४ आणि पारशी समाजातील ५७५ अशा एकूण २ लाख ८५,४५१ विद्यार्थ्यांना या वर्षी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

          जिल्हा व तालुक्यातील सर्व शाळांना याबाबत सूचित करण्यात यावे. मागील वर्षी ज्या शाळांनी शाळांची नोंदणी केलेली नाही अशा शाळाची नोंदणी प्रक्रिया मुदतीत करून घेण्यात यावी. जर अल्पसंख्याक विद्यार्थी केवळ शाळांची नोंदणी न केल्याने शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिले तर त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहील असेही या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

- सकाळ


          तुम्हाला प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पोर्टल सुरू ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments