Boxed(True/False)

Header Ads

NEET, JEE Main परीक्षा 2 महिन्यांनी पुढे ढकलल्या

 NEET व JEE Main परीक्षा 2 महिन्यानी पुढे ढकलल्या 

NEET, JEE Main परीक्षा 2 महिन्यांनी पुढे ढकलल्या

          NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा कोरोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे. ऐन परीक्षांच्या काळात कोरोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. 

          कोरोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

          केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 27 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 31 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल,” अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

          तुम्हाला NEET, JEE Main परीक्षा 2 महिन्यांनी पुढे ढकलल्या  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments