Boxed(True/False)

Header Ads

MPSC च्या अभ्यासक्रमात बदल

MPSC च्या अभ्यासक्रमात बदल


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सहा विषयांपैकी चार विषयांतील घटकांमध्ये बदल केला आहे. सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आल्याचे एमपीएससीने घोषणापत्राद्वारे जाहीर केले आहे. 
           महाराष्ट्रातील राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण सहा विषय असतात. त्यातील सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ आणि सामान्य अध्ययन ४ असे चार विषय असतात. या चार विषयांतील काही घटकांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रम घोषणापत्र प्रसिद्ध झालेल्या दिनाकांपासून पुढील परीक्षांसाठी लागू असेल, असे आयोगाने स्षष्ट केले आहे. 
          मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आला असून, इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत समजण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

          तुम्हाला आमचा शालेय परिपाठ ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments