Boxed(True/False)

Header Ads

१ ऑगस्ट पासून ITI Admission प्रक्रिया सुरू

१ ऑगस्ट पासून ITI Admission प्रक्रिया सुरू


           राज्यात नुकताच HSC Result  जाहीर झाल्यानंतर आता पुढील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरु झाल्या आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा कल आयटीआय कडे अधिक असतो.

आयटीआय प्रवेशासाठी अर्हता

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे 14 वर्षावरील उमेदवार ITI अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.


प्रवेश प्रक्रिया

यावर्षी प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. ITI प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत Online पध्दतीने राबविण्यात येणार आहे. 


प्रवेश प्रकियेचे अर्ज 

https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 1 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. 


आयटीआय प्रवेशासाठी जागा

  • राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी 4 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी 2 स्वतंत्र संस्था व 43 शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.
  • राज्यात 569 खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. 
  • राज्यात शासकीय आणि खाजगी 986 आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता 1 लाख 45 हजार 828 विद्यार्थी इतकी आहे.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करणे : 1 ते 14 ऑगस्ट 2020
  • पहिल्या फेरीसाठी प्राधान्य : 2 ते 14 ऑगस्ट
  • प्राथमिक गुणवत्ता यादी : 16 ऑगस्ट सकाळी 11 वाजता
  • हरकत / बदल नोंदणी : 16 आणि 17 ऑगस्ट
  • अंतिम गुणवत्ता यादी : 18 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता
  • पहिली प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट
  • दुसरी प्रवेश फेरी : 30 ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : 7 सप्टेंबर
  • चौथी प्रवेश फेरी : 15 सप्टेंबर
  • नवीन प्रवेश : 1 ते 19 सप्टेंबर


          तुम्हाला १ ऑगस्ट पासून ITI Admision प्रक्रिया सुरू ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments