Boxed(True/False)

Header Ads

IIT Admission साठी आता गुणांची अट यंदा रद्द फक्त बारावी उत्तीर्ण आवश्यक

IIT Admission साठी आता गुणांची अट यंदा रद्द फक्त बारावी उत्तीर्ण आवश्यक

IIT Admission साठी आता गुणांची अट यंदा रद्द फक्त बारावी उत्तीर्ण आवश्यक

        देशातील लॉकडाऊनमुळे काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या, तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'आयआयटी' मधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अँडव्हान्स्डच्या या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. 'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अँडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत 75 टक्के किंवा टॉप 20 पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. 
        यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा आणि जेईई अँडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. यावर्षी कोरोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने बारावी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.


          तुम्हाला IIT Admission साठी आता गुणांची अट यंदा रद्द फक्त बारावी उत्तीर्ण आवश्यक ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments