Boxed(True/False)

Header Ads

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम होणार 30 टक्यांनी कमी

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम होणार ३० टक्यांनी कमी

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम होणार 30 टक्यांनी कमी

        देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद असल्यामुळे, शिक्षणाची वेळही कमी झाली आहे, या कारणास्तव सीबीएसईने 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता ९ वी ते १२ वीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

        शालेय अभ्यासक्रम ३० टक्कके कमी केला असला तरी मात्र अभ्यासक्रमात मूळ संकल्पना राखून ठेवून, हा कमी केलेला अभ्यासक्रम बोर्ड परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी निर्धारित विषयांचा भाग असणार नाही. शालेय प्रमुख आणि शिक्षक मिळून विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांना कमी केलेल्या अभ्यासक्रमाबाबत समजावून सांगतील.

        देशाचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केलं की.. सीबीएसई अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी काही आठवड्यांपूर्वी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी जवळपास 1.5 हजारहून अधिक सूचना आल्या होत्या, असं पोखरियाल यांनी ट्विट करत सांगितलं.


          तुम्हाला CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम होणार 30 टक्यांनी कमी ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments