Boxed(True/False)

Header Ads

महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी महाजॉब पोर्टलवर नोकरीची संधी

महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी महाजॉब पोर्टलवर नोकरीची संधी

भूमीपुत्रांसाठी महाजॉब पोर्टलवर नोकरीची संधी

          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औद्योगिक महाजॉब्स संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 50 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यावर 64 हजार उद्योग सुरू झाले.


           वरील साईटवर नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि डोमिसाईल असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे. तर कौशल्य विकास अंतर्गत इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डिंग असे 950 व्यवसायांची सरकारने नोंद घेतली आहे. 
       
  या पोर्टलवर अर्ज कसा करायचा ?
  1. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल आहे का?
  2. तुमची वैयक्तिक माहिती भरुन पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
  3. तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी (पर्यायी) ही माहिती
  4. दिल्यावर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल.
  5. तो मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी निश्चित होईल. 

          तुम्हाला महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी महाजॉब पोर्टलवर नोकरीची संधी ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments