Boxed(True/False)

Header Ads

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी


विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी

          विद्यापीठ परीक्षांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. 'युजीसी'च्या मार्गदर्शकतत्वांनुसार परीक्षांना गृहमंत्रालयाने अनुमती दिलेली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे आता परीक्षेदरम्यान पालन करावं लागणार आहे. आठवडाभरापूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता असे सांगण्यात आले आहे की, विद्यापीठाच्या शेवट्या वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या मार्गदर्शकतत्वांनुसार घ्यायच्या आहेत. गृहमंत्रालयाने यास परवानगी दिली आहे.

          गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना हे पत्र लिहून सूचना केलेल्या आहेत. या परीक्षा घेत असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, ज्यामध्ये विद्यार्थांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. या सर्वांचं पालन केलं जाणार आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्य सरकार ज्यांनी या परीक्षा रद्द करण्याचं म्हटलं होतं, पंतप्रधानांना देखील पत्र पाठवलं होतं. आता या निर्णयानंतर नेमकी राज्य सरकारची भूमिका काय असणार? या परीक्षेबाबत निर्णय काय घेणार? हे पाहावं लागणार आहे. मागील काही दिवसांपासून याच मुद्यावरून विद्यार्थांसह पालकही संभ्रमात होते.


          तुम्हाला विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments