Boxed(True/False)

Header Ads

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 'जिओ ज्ञानगंगावर'

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 'जिओ ज्ञानगंगावर'

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 'जिओ ज्ञानगंगावर'

           शाळा बंद असतानाही शिक्षणासाठी आता दूरचित्रवाणी वाहिनीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्यातील 4.3 कोटी लोकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहेत. आता जिओ टीव्हीद्वारे विद्यार्थी अभ्यास करू शकतील. जिओ टीव्हीवर बारावी विज्ञान आणि दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी ‘जिओ ज्ञानगंगा’ या 3 वाहिन्यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी या रविवारी उद्घाटन केले. त्याचबरोबर जिओ सावन या रेडिओ चॅनेलवर ‘वुई लर्न इंग्लिश’ या कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

          जिओ टीव्हीवरील 3 वाहिन्यांवर रोज 6 तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर 18 तास त्याचे पुनप्रक्षेपण केले जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या काळात अजून 9 वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. दहावी उर्दू माध्यम, नववी, आठवी, सातवी, सहावी, तिसरी आणि चौथी या इयत्तांसाठी इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमातील वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.

          तुम्हाला दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 'जिओ ज्ञानगंगावर' ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments