Boxed(True/False)

Header Ads

सीए मे 2020 च्या परीक्षा रद्द

सीए मे 2020 च्या परीक्षा रद्द

मुंबई : मे 2020 च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नोव्हेंबर 2020 मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन माहिती दिली.

सीए मे 2020 च्या परीक्षा रद्द

सुरुवातीला सीए परीक्षा 2 मे ते 18 मे दरम्यान होणार होती. मात्र देशभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलून 19 जून ते 4 जुलै दरम्यान घेण्याचं ठरलं होतं. मात्र त्यानंतरही ही परीक्षा रद्द करुन जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय झाला. 29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान ही परीक्षा पार पडणार होती. मात्र आता ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.


नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी नवा अर्ज

आयसीएआने शुक्रवारी उशिरा यासंदर्भात अधिसूचाना जारी केली. आयसीएआयनुसार, "ज्या विद्यार्थ्यांनी मे 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांच्याकडे आता नोव्हेंबर 2020 परीक्षेसाठी नवा अर्ज करताना आपला ग्रुप आणि परीक्षा केंद्र बदलण्याचापर्याय असेल. नोव्हेंबरमध्ये होणारी सीए परीक्षा 1 तारखेपासूनच सुरु होईल. मात्र परीक्षा सुरु होण्याआधी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल."

29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सीए परीक्षेच्या आयोजनाची व्यवहार्यता पडताळली जाईल, असं आयसीएआने गुरुवारी (2 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करावी अशी मागणी विद्यार्थी वारंवार करत होते.

ABP माझा


          तुम्हाला सीए मे 2020 च्या परीक्षा रद्द  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 



Post a Comment

0 Comments