Boxed(True/False)

Header Ads

महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी

महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी 

महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी

         महाराष्ट्र राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसुचनेनुसार 

  • शिक्षकांच्या प्रवर्ग 'क' मध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
  • प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ज्येष्ठता सूची स्वतंत्रपणे ठेवण्यात येणार आहे. 
  • आवश्‍यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची ज्येष्ठता यादीही प्रवर्गानुसार ठेवण्यात येणार आहे. 
  • यावर हरकती दाखल करण्यासाठी 23 जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

          महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी विनियमन अधिनियमानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणखी सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या नियमांचा मुसदा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचा विषय वादग्रस्त ठरत होता. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

           शिक्षकाने उच्च शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेत सुधारणा केली असेल तर त्यांच्या सेवेतील नियुक्ती दिनांक विचारात न घेता प्रशिक्षित शिक्षक म्हणून शैक्षणिक अथवा व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याच्या दिनांकापासून संबंधीत शिक्षक उच्च प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी पात्र ठरेल. संबंधीत प्रवर्गात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकानंतर त्याचा सेवाज्येष्ठताक्रम निश्‍चित करण्यात येणार आहे.

          प्राथमिक शिक्षकाने उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असेल मात्र माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधीत शिक्षक, माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवाज्येष्ठतेच्या सूचीमध्ये ज्येष्ठतेचा दावा करु शकणार नाही. त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाणार आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आलेले आहे. राज्यातील शिक्षक संघटनांना या अधिसूचनेतील मसुद्याचा अभ्यास करुन हरकती शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे नोंदवाव्या लागणार आहेत.

-प्रभात

Post a Comment

3 Comments

  1. सेवाज्येष्ठता ठरविताना वेतनश्रेणी ऐवजी शैक्षणिक पात्रता व मूळ नियुक्ती विचारात घ्यावी

    ReplyDelete
  2. सदर बदलामुळे माध्यमिक शाळासंहितेचा मूळ ढाचा बदलण्याचा प्रयत्न केला जातोय उच्च अर्हता प्राप्त करून पदोन्नत्या मिळवण्याचा शिक्षकांचा हक्क त्यामुळेडावलला जाईल न्यायालयांनी वेळोवेळी दिलेले निर्णय तसेच 3/5/2019 व19/10/2019 रोजीचे शासन निर्णय बदलून न्यायालयाने दिलेले निर्णय बदलून बी एड/इन डीएड स्केल वरील शिक्षकांना पदोन्नत्या डावलण्याचा हा डाव आहे त्यामुळे वेतनश्रेणी ऐवाजी शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन अर्हता प्राप्त केल्याच्या दिनांकापासून सेवाजेष्ठतेचा लाभ शिक्षकांना मिळालाच पाहिजे .डी एड वेतनश्रेणी तुन बी एड वेतनश्रेणी देताना ती पदोन्नती नसते तर वेतनोन्नती असते वेतनबदल होतांना फक्त वेतन श्रेणी बदलते वेतनवाढ दिली जात नाही म्हणजेच डी एड व बीएड नियुक्त शिक्षक हे एकाच म्हणजे क प्रवर्गात असताना व 1977व 1981 च्या शाळा संहितेमध्ये पदोन्नत्यासाठी शैक्षणिक पात्रता महत्वाची मानून त्यानुसार सेवाजेष्ठता सूची ठेवावी हे स्पष्ट केलेले असताना नव्याने दुरुस्ती करण्याची काहीच गरज नाही ,तसे असते तर उच्च न्यायालयाने याविषयीच्या याचिका निकालात काढतांना अनुसूची फ नुसार याद्या बनवा असे सांगितले नसते 3/5/19च्या निर्णयात बदल करून संस्था चालकांचे अधिकार वाढवून पात्र शिक्षकांचे पदोन्नत्याचा हक्क डावलण्यासाठी हा सर्व खटाटोप चाललाय असे वाटते त्यामुळे ह्या बदलास माझी हरकत आहे

    ReplyDelete
  3. डी.एड. स्केलवर नियुक्त असलेल्या शिक्षकाने, नंतर केंव्हाही बी.एड. पदवी धारण केली असेल, तर क प्रवर्गासाठी डी.एड. नियुक्तीपासुन सेवाज्येष्ठता ग्राह्य धरली जावी. डी.एड. स्केलवर नियुक्त असलेली व्यक्ती ही "शिक्षक" म्हणुनच नेमणुक असते, आणि त्याच शिक्षकाने बी.एड.पदवी प्राप्त केल्यानंतर सुध्दा "शिक्षक" म्हणुनच सेवा करण्याचा अनुभव असतो. डी.एड. नियुक्त शिक्षक म्हणजे शिक्षकेत्तर म्हणुन सेवा करत नाही, तर तो "शिक्षक" म्हणुनच सेवा करण्याचा अनुभव घेत असतो.
    तर "क" प्रवर्गात समावेश करतांना डी.एड; व बी.एड. असा भेद न करता "उपशिक्षक" पदावरची नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी. नियुक्ती डी.एड. ची असेल की, बी.एड. ची असेल. तो शिक्षक पदावर काम केंव्हापासुन करतो, ते महत्वाचे आहे. असेतर नाही ना डी.एड. नियुक्ती चा शिक्षक हा शिपाई, नाईक, प्रयोग शाळा परिचर, लिपीक, या पदावर होता, आणि बी.एड्. पदवी धारण केल्यानंतर तो उपशिक्षक पदावर लायक झाला.
    पुर्वी "क" प्रवर्गात समावेश करतांना डी.एड. किंवा बी.एड्. असा भेद नव्हता. उपशिक्षक पदावर नियुक्ती दिनांकापासुन सेवा ज्येष्ठ समजुन क प्रवर्गात समावेश केला जात असे. डी.एड्. किंवा बी.एड्. नियुक्ती दिनांक विचारात घेतला जात नव्हता, तर तो उपशिक्षक पदावर केंव्हापासुन सेवा करतो, यावरून "क" प्रवर्गात ज्येष्ठ समजला जात असे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेसाठी डी.एड. व बी.एड. नियुक्तीचा भेद न करता मूळ नियुक्ती दिनांक सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य समजावा.

    ReplyDelete