Boxed(True/False)

Header Ads

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होणार आंतरजिल्हा बदल्या

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होणार आंतरजिल्हा बदल्या

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होणार आंतरजिल्हा बदल्या

सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने ग्रामविकास विभागाने प्रक्रिया सुरु केली आहे. शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात अनेक शिक्षक संघटनांनी पाठपुरावा केला होता. या बदल्या होणार असल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने स्पष्ट होते.

          कोरोना विषाणूचा प्रसार वाढत चालला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांच्या बाबत काय होणार याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता हालचाली सुरु झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विस्थापित झालेल्या शिक्षकाना तसेच पती-पत्नी, गंभीर आजार, वर्षावरील गैरसोयीत असणाऱ्या शिक्षकांना सोयीत आणण्यासाठी जिल्हांतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत, अशी मागणीही संघटनांच्यावतीने ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

          आंतर जिल्हा बदलीचे ऑनलाईन माहिती भरुन तयार आहे. त्याही बदल्या करुन बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या शिक्षकाना सरकरा न्याय देण्याच्या तयारीत आहे. याबाबत शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्याची विनंती केली आहे.

          राज्यातील कोरोना संकटामुळे बदल्याचा निर्णय पुढे ढकलला होता. पण, आता बदल्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जुलैअखेर या बदल्या होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. बदली समितीला सॉफ्टवेअर तयार करण्यास सांगितले आहे. जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा सोयीच्या बदल्यांचे धोरण राबविण्याचा सरकार विचार करत आहे.

- सकाळ


          तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होणार आंतरजिल्हा बदल्या ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments