Boxed(True/False)

Header Ads

सवलतीच्या गुणांसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे प्रस्तावाबाबत बोर्डाने केली महत्त्वाची घोषणा


सवलतीच्या गुणांसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे प्रस्तावाबाबत बोर्डाने केली महत्त्वाची घोषणा

सवलतीच्या गुणांसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे प्रस्तावाबाबत बोर्डाने केली महत्त्वाची घोषणा

         महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील खेळाडू, एन.सी.सी. स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या वाढीव गुणांसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आता 20 जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. ही मुदतवाढ अंतिम असून निकाल वेळेवर लावण्याच्या दृष्टीने यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

          महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती लक्षात घेता खेळाडूंचे गुण प्रस्ताव तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करण्यासाठी मंडळाने यापूर्वीच 20 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत सादर होऊ शकलेले नाही.

त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि खेळाडू संघटनांनी मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे ही मुदतवाढ दिली आहे. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना आता खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव 20 जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. तर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून ते 25 जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशींसह सादर करावेत.

          एन.सी.सी. आणि स्काऊट गाईड प्रस्तावाबाबतही या वाढीव मुदतीप्रमाणे कार्यवाही करावी. हा शासन निर्णय केवळ 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरिता लागू आहे. तसेच ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. त्यामुळे कोणताही पात्र विद्यार्थी या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नमूद केले आहे.

- सकाळ

आपल्यासाठी इतर सेवा 



          तुम्हाला सवलतीच्या गुणांसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे प्रस्तावाबाबत बोर्डाने केली महत्त्वाची घोषणा ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments