Boxed(True/False)

Header Ads

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा...


दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा...

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा...

  • दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 भूगोल व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने एक पत्रक काढले आहे. 
  • या विषयांच्या परिक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.               
  • सामाजिक शास्त्रे पेपर-२ भूगोल या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेणार आहेत.
  • तसेच त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी, तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेणार आहेत.
  • त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
  • दरम्यान, राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल), दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

          तुम्हाला दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा... ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments