Boxed(True/False)

Header Ads

शाळा या तारखेपासून सुरू होणार | School will start from this date

शाळा या तारखेपासून सुरू होणार

School will start from this date

शाळा या तारखेपासून सुरू होणार | School will start from this date

शाळा कधी सुरू होणार असा पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये तारखांविषयी संभ्रम राहू नये. म्हणून या वर्षीपासून दरवर्षी राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होतील.

विदर्भातील शाळा मात्र ३० जूनपासून सुरू होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली.

शाळा १५ जूनला सुरू होतील परंतु त्या दिवशी जर रविवार किंवा सुट्टी असेल तर त्याच्या पुढच्या दिवशी शाळा सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.

शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत या वर्षीदेखील मुलाच्या शाळेतील प्रवेशाचे स्वागत केले जाणार आहे.

शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


केंद्र सरकारचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.

या वर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स सरकारतर्फे दिले जाणार आहेत.

पुस्तकांमध्ये प्रत्येक धडय़ानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हे पण वाचा :- जागतिक ओझोन दिन



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  शाळा या तारखेपासून सुरू होणार | School will start from this date  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments