Boxed(True/False)

Header Ads

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नवीन प्रक्रिया जाहीर | New admission process announced for students from class 1st to 12th

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नवीन प्रक्रिया जाहीर

New admission process announced for students from class 1st to 12th

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नवीन प्रक्रिया जाहीर | New admission process announced for students from class 1st to 12th

          पुढील शैक्षणिक वर्षांपासून शालेय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांना आधारकार्डची सक्ती केली आहे. यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पुढील प्रमाणे आहेत ते नवीन नियम.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी नवीन नियम

प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती ही 'प्रवेश देखरेख समिती' म्हणून काम पाहील. 

सदर समिती प्रवेश प्रक्रियेवर देखरेक आणि नियंत्रण ठेवेल.

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतींमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा.

प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे.

प्रवेश अर्जावर विद्यार्थ्याच्या फोटोसह पालकांचा फोटो आवश्यक असेल.

प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्रप्रमुखाकडे आणि दुसरी प्रत शाळा व्यवस्थापन समितीकडे जाईल.

प्रवेश अर्जासह विद्यार्थ्याच्या आधार कार्ड घ्यावे. 

पालकाचेही आधारकार्ड सादर करण्यात यावे.

काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणांमध्ये 'बालकाचे आणि पालकाचे अधार कार्ड सादर केले जाईल' या अटीच्या आधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.

शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी वर्षातून दोनवेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करावी.

विद्यार्थ्याचे हजेरीपटातील नाव आणि तपशील प्रवेश अर्जातील तपशीलासोबत पडताळणी करावी.

या पडताळणीमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याने एका महिन्यात चौकशी अहवाल सादर करावा.

खाजगी, अनुदानित, अंशत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व प्रकारच्या शाळांना ही नियमावली लागू असेल.

          वरील प्रमाणे प्रवेश प्रक्रियेचे पालन न केल्यास किंवा अनियमितता आढळून आल्यास संबंधित शाळेचे अनुदान थांबवण्याबाबत किंवा शाळेची मान्यता काढण्याबाबत कार्यवाही केली जाऊ शकते.
source : bbc.com



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नवीन प्रक्रिया जाहीर | New admission process announced for students from class 1st to 12th ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments