Boxed(True/False)

Header Ads

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर | CTET Exam dates announced

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर

CTET Exam dates announced


           केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. CTET परीक्षेची 15 वी संगणक आधारित चाचणी 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाणार असून ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांना केवळ CTET वेबसाइटद्वारे ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, तर 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3:30 पर्यंत फी भरता येणार आहे.
           सामान्य/ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये, तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याबाबत सीबीएसईने जुलै 2021 मध्ये अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, यात काही बदलही करण्यात आले आहेत.



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक ला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर | CTET  Exam dates announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments