Boxed(True/False)

Header Ads

१ ली ते १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय | Decision to reduce 25% syllabus from 1st to 12th standard

१ ली ते १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय

Decision to reduce 25% syllabus from 1st to 12th standard

१ ली ते १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय | Decision to reduce 25% syllabus from 1st to 12th standard


          महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण वेळेत शाळा सुरू होण्याची कमी शक्यता आहे. आता ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. मात्र ऑनलाईन शिकवणीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे पुर्ण अभ्यासक्रम शिकवणं शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी निर्णय घेतला आहे.

           यावर्षीही कोरोनाच्याची दुसरी लाट आल्यामुळे शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती जाहीर करण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला १ ली ते १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय | Decision to reduce 25% syllabus from 1st to 12th standard   ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments