Boxed(True/False)

Header Ads

SSC, HSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.....

SSC, HSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.....

SSC, HSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.....

           महाराष्ट्र राज्यातील कोरोना वाढत असल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा देता येणार आहे. तसे नियोजन माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केले आहे. त्यासाठी दहावी-बारावीचे शिक्षक वगळून पाचवी ते अकरावीच्या वर्गांवरील शिक्षकांना पर्यवेक्षकाची ड्यूटी दिली जाणार आहे. परंतु, को-मॉर्बिड तथा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना पर्यवेक्षकाची ड्यूटी दिली जाणार नाही.
          यावर्षी दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून तर बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पारंपरिक परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा घेणे शक्‍य नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत (गावात अथवा घराजवळ) परीक्षा देता येणार आहे.
          ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील व्यक्‍ती कोरोनाबाधित अथवा जो विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी अंदाजे 15 जूनपूर्वी स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, परीक्षेपूर्वी पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त झालेल्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. पालकांना त्यासंदर्भात परीक्षेच्या आठ दिवस अगोदर सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा होणार असल्याने जागेची कोणतीही कमतरता भासणार नाही, विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्राधान्य राहील, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी स्पष्ट केले.

जूनमध्ये होईल विशेष परीक्षा
          दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार असून, त्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे. असे माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे चे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणाले...
  1. पर्यवेक्षकाची ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांची होणार परीक्षेपूर्वी कोरोना टेस्ट
  2. वर्ग नियंत्रण, परीक्षेचे नियोजन, शिस्त-नियमांचे पालन, अशी कामे ज्येष्ठ शिक्षकांना दिली जातील
  3. माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील पाचवी ते अकरावीच्या सर्वच शिक्षकांवर असेल परीक्षेची जबाबदारी
  4. तालुका स्तरावर परीक्षेचे नियोजन करण्याची केंद्र प्रमुखांवर जबाबदारी; त्यांच्या जोडीला सहाय्यक केंद्रप्रमुख असेल
  5. सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक - उच्च माध्यमिकच्या एक हजार 87 शाळांमधील सव्वालाख विद्यार्थी देतील परीक्षा

- सकाळ

          तुम्हाला SSC, HSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.....  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.


Post a Comment

0 Comments